Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आधी प्रेमसंबंध नंतर ब्लॅकमेलिंग, बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या





बीड : आधी प्रेमसंबंध नंतर ब्लॅकमेलिंग केल्याने एका पोलिस कॉन्स्टेबलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिलीप केंद्रे असे आत्महत्या केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. मंगळवारी (17 डिसेंबर) ही घटना घडली. महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या त्रासाला कंटाळून दिलीप केंद्रे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊस उचलल्याचे बोलले जात आहे.


मिळालेली माहिती अशी की, दिलीप केंद्रे यांचे जळगाव येथे कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कॉन्स्टेबलशी प्रेमसंबंध होते. मात्र, केंद्रे यांची बीडला बदली झाल्याने संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबल त्यांना ब्लॅकमेल करत होती. तिच्या त्रासाला कंटाळून दिलीप केंद्रे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आत्महत्येनंतर दिलीप केंद्रे यांच्या खिशात दोन पानांची सुसाईड नोट सापडली. त्यात त्यांनी संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या नावाचा उल्लेख केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 वर्षांपूर्वी दिलीप केंद्रे हा तरुण जळगाव जिल्ह्यात पोलिस दलात रुजू झाले होते. तेथीलच एका सहकारी महिलेसोबत त्यांचे प्रेम जुळले होते. पाच वर्षांनंतर दिलीप केंद्रे यांची बदली जळगावाहून बीडला झाली. त्यानंतर या दोघांत एकमेकांना भेटण्यावरुन कुरबूर सुरु झाली. गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित महिला सहकारी आणि दिलीप केंद्रे यांच्यात वाद सुरु होता. यानंतर संबंधित महिलेने तिच्या एका अन्य मित्राच्या सहाय्याने दिलीप केंद्रे यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून दिलीप केंद्रे यांनी त्यांच्याजवळील बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.