Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

झारखंडमध्येही भाजपाची घसरगुंडी झारखंड मुक्ती मोर्चा-कॉंग्रेस सत्तेच्या दारात, राष्ट्रवादीचा एक उमेदवार आघाडी घेऊन



महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळूनही सत्तेबाहेर फेकल्या गेलेल्या भाजपाला झारखंडमध्येही जबरदस्त धक्का बसत असून झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सुरू झाली तेव्हा निकालाचे कल पाहता झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्र पक्ष बहुमताकडे वाटचाल करताना दिसून दिसून येत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत भाजपा केवळ २९ जागांवर आघाडी घेऊ शकली तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस मित्र पक्ष तब्बल ४२ जागांवर आघाडी घेऊन होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक उमेदवार मोठी आघाडी घेऊन असून बहुमतासाठी ४१ जागांची गरज आहे.

  ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज सकाळी सुरू झाला. सुरुवातीला काट्याच्या टकरीमध्ये असलेला भाजप एक तासानंतर मागे पडत राहिला. झारखंडमध्ये सत्ता स्थापनेसाठी ४१ जागांची गरज आहे. झारखंड मुक्ती मोर्चासह कॉंग्रेस मित्र पक्षांची या ठिकाणी युती असून भाजपाला धूळ चारत कॉंग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाने या ठिकाणी प्रचंड आघाडी घेतल्याचे चित्र पहावयास मिळते. राम मंदिरासह नागरित्व संशोधन कायद्याचा मुद्दा झारखंडमध्ये चालला नसल्याचे यावरून स्पष्ट होते. अशा स्थितीतही भाजपाकडून ‘आमचीच सत्ता येईल’, असा दावा केला जात आहे. दुपारी एकनंतर तब्बल १२ ते १३ फेर्‍यांची मतमोजणी होणार आहे. मात्र सद्यस्थितीतील आकडे पहाता झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने आघाडी घेऊन आहेत. दुपारी एक वाजता भाजप २९ वर, झारखंड मुक्ती मोर्चा-कॉंग्रेस आघाडी ४१, राष्ट्रवादी कॉंग्रेस १, इतर १० जागांवर आघाडी घेऊन आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल परंतु भाजपा हातातील हेही राज्य आता निसल्याचे दिसून येते.

झारखंड भाजपाच्या हातातून जात असल्याचे पाहून गेल्या सात वर्षाच्या कार्यकालाचा इतिहास तपासला तर २०१४ साली भाजपा केंद्रात सत्तेत आल्यानंतर त्यांची विजय घोडदौड सुरू झाली. २०१४ साली केवळ ७ राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने २०१७ च्या शेवटपर्यंत २२ राज्य काबिज केले होते. देशात मोदींची लाट आणि अमित शहा यांच्या चाणक्य नितीच्या जोरावर यश मिळविले. मात्र २०१८ च्या मे नंतर भाजपाला राज्या राज्यांमध्ये हद्दपार व्हावं लागत आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यातून भाजपाची सत्ता गेली. महाराष्ट्रातूनही गेली आणि आता झारखंडही हातातून जात आहे.