Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आज जि.प.सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सने करणार चर्चा खा. प्रीतम मुंडेंवर जि.प. निवडणुकीची जबाबदारी उद्या मंत्रिमंडळ, खातेवाटपानंतर राष्ट्रवादी नेते येणार हरकतमध्ये


बीड :- अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपासह राष्ट्रवादीने झेडपी आपल्याच ताब्यात यावी यासाठी ताकत लावली असून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या या निवडणुकीत पंकजा मात्र त्या दिवशी अनुपस्थित असणार असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. ही निवडणूक खा. प्रीतम मुंडे यांच्या देखरेखीखाली पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात येते. आज दस्तुरखुद्द पंकजा मुंडे सहलीवर असलेल्या जि.प. सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सने बातचीत करणार असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे.

  राष्ट्रवादी बहुमतात असताना गेल्या अडीच वर्षांपासून सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर यांच्या बंडखोर भूमिकेमुळे भाजपाच्या ताब्यात गेलेली बीडची जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात राहावी यासाठी भाजपनेत्या पंकजा मुंडे प्रयत्नांची परीकाष्ठा करीत आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले ते पाच बंडखोर सदस्य अपात्र ठरवले गेल्याने आणि दोन जि.प. सदस्य आमदार झाल्याने ६० सदस्यांची जिल्हा परिषद आता ५३ सदस्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीत प्रचंड चुरस असून भाजपाने गेल्या दहा दिवसांपूर्वीच आपले जि.प.सदस्य सुरक्षितस्थळी हलवले अहेत. राज्यात झालेलं सत्तांतर, निर्माण झालेली महाविकास आघाडी आणि बीडमध्ये शिवसेनेकडे असलेले चार जि.प. सदस्य यामुळे या निवडणुकीत नेमके काय होईल हे सांगणे कठीण असून विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्याच्या तयारीत आहेत. परंतु सुत्रांच्या सांगण्यानुसार ४ जानेवारी रोजी होणार्‍या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या या निवडीदरम्यान पंकजा मुंडे अनुपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. या निवडणुकीची सर्व जबाबदारी खा. प्रीतम मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सहलीवर असलेल्या भाजपाच्या जि.प. सदस्यांसोबत पंकजा मुंडे यांचं बोलणं होणार असं सांगितलं जात होतं. भाजपाचे हे सदस्य नेमके कुठे आहेत? हे सांगणे कठीण असले तरी रिपोर्टरच्या सूत्रानुसार हे सर्व सदस्य आज नाशिकला असल्याचे सांगण्यात येते. पंकजा मुडे या जि.प. सदस्यासोबत व्हिडिओ र्कान्फरन्सने चर्चा करणार असल्याचेही विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगितले जात असून आज मितीला भाजपाकडे बहुमत असल्याचे बोलले जाते. परंतु शिवसेनेचे चार सदस्य काय निर्णय घेणार याला अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. राष्ट्रवादीही सत्ता ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.
त्या पाच सदस्यांच्या प्रश्‍नी २ तारखेला सुनावणी
निलंबीत करण्यात आलेल्या त्या पाच सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल केली आहे. १६ जानेवारीला यावर सुनावणी होणार होती, परंतु आता ४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने ४ जानेवारीला यावर सुनावणार असल्याचे सांगण्यात येते.