Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीड शहरात ९३ जोडप्यांचे लावले निकाह संसार उपयोगी साहित्यांचीही दिली भेट चार वर्षापासून उपक्रम सुरू


बीड जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील गरीब आणि अनाथ मुलांच्या लग्नासाठी शहरातील काही दानशूर आणि समाजसेवकांनी पुढाकार घेतला. इज्तेमाई शादीयॉ कमेटीच्या माध्यमातून विवाह सोहळा आयोजीत करुन समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला जात आहे. आज मोमीनपूरा बायपास परिसरामध्ये ९३ जोडप्यांचे निकाह लावण्यात आले. यामध्ये नव दाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्यही देण्यात आले आहे. या सामुदायीक विवाह सोहळ्याला आ.संदिप क्षीरसागर,माजी आ. सय्यद सलीम,माजी.आ.सिराज देशमुख, माजी आ.अमरसिंह पंडीत, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्षे पोद्दार, आ. विनायक मेटे, माजी आ.सुनील धांडे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

पैश्याविना अनेक गोरगरीब मुलीचे लग्न रखडत असतात त्यातच मुलींचे लग्न करणं हे वडिलाच्या डोक्यावर एक प्रकारे ओझे समजले जाते. लग्न अत्यंत साध्या पध्दतीने करुन आदर्श निर्माण करणारे खुपच कमी लोक असतात. समाजामध्ये अनेक दानशुर मंडळी  सामूहीक विवाह सोहळे आयोजीत करुन एक नवा आदर्श समोर ठेवत असतात. मुस्लीम समाजातील गरीब आणि अनाथ मुलांचे लग्न लावण्याचा (पान ७ वर)
चांगला उपक्रम इज्तेमाई शादीयॉ कमिटीने हाती घेतला आहे. मागील चार वर्षापासून ही कमिटी गोर गरीबांचे लग्न लावत आहे. यावर्षीही ९३ जोडप्याचे लग्न लावण्यात आले आहे. आज सकाळी ११.३० वाजता मोमीनपूरा येथील बायपास रोडवर लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कमिटीचे मौलाना अब्दुल बारी, हाजी जमील, मैनोद्दीन, हाजी सलीम यांच्यासह आ.संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, आ. विनायक मेटे,माजी आ. अमरसिंह पंडीत, माजी आ. सिराज देशमुख, माजी आ.सुनिल धांडे, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्षे पोद्दार, महादेव धांडे, हेमंत क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमिटीच्यावतीने सर्व मंडळींना जेवणाची सोय करण्यात आली होती. नवदाम्त्पत्यांना संसार साहित्याचे वाटप करण्यात आले. लग्न सोहळ्याला जिल्हा भरातील हजारो नागरीकांची उपस्थिती होती.