बीड :-घरगुती कारणावरून विवाहित महिलेचे हातपाय बांधून तिला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. महिलेस उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान तिचा रात्री मृत्यू झाला. आज सकाळी सदरील महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या महिलेचा तहसीलदार व पोलिसांनी मृत्यूपूर्व जबाब नोंदवला असून ‘आपणास सासरच्यांनी जाळले’, असे महिलेने जबाबात म्हटले होते. त्यानुसार आरोपींविरोधात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ऋतुजा भास्कर बिटे (वय १९, रा. साळींबा ता. वडवणी) या महिलेचा गेल्या सहा महिन्यांपूर्वी विररवाह झाला होता. सदरील महिलेचे माहेर परभणी जिल्ह्यातील सेलू आहे. लग्नानंतर काही दिवस सुखाचे गेले, मात्र त्यानंतर सासरच्यांनी विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. सासू ऋतुजा हिला नेहमीच टोचून बोलायची व तिचा छळ करायची. यातून सासूच्या सांगण्यावरून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जीवंत पेटवून दिले. यात ती गंभीररित्या भाजली होती. तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान सदरील महिलेचा रात्री मृत्यू झाला. आज सकाळी मयत महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. महिलेने मृत्यूपूर्व जबाब तहसीलदार आणि पोलिसांकडे दिलेला आहे. ‘आपणास सासरच्यांनी जाळले’ असे जबाबात म्हटले आहे. त्यानुसार तात्काळ आरोपींविरोधात ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला मयत झाल्यानंतर पोलिसांनी ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रकरणी पती भास्कर प्रल्हाद बिटे व सासू रुक्मीन प्रल्हाद बिटे या दोघांना वडवणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही दुसरी घटना
काही वर्षापुर्वी याच घरातील मुलगी प्रियकराबरोबर बीड येथे चिञपट पाहण्यासाठी गेली होती म्हणून बापाने तिला जिवच मारुन टाकले होते.या प्रकरणात वडिलाविरुध्दात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.आणि आता याच घरातील सुनेला नवरा व सासूने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले आहे.यात नवरा व सासू विरुध्दात ३०२ चा गुन्हा दाखल होणार असून अशा प्रकरची हि या घरात दुसरी घटना असाल्याने अश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Source रिपोर्टर
