Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हिरापूरमध्ये आढळला मुन्नाभाई एमबीबीएस बोगस डॉक्टर मादळमोही वैद्यकीय अधिकार्‍यांनी केली कारवाई



बीड :- गेल्या अनेक दिवसांपासून हिरापूर गावामध्ये बोगस दवाखाना चालवणारा डॉक्टर आढळून आल्याने काल मादळमोही येथील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून या बोगस डॉक्टरावर कारवाई केली.
  हिरापूर (ता. गेवराई) या गावामध्ये डॉ. सुनील सेन (वय ४२) हे गेल्या अनेक दिवसांपासून विनापरवाना त्यांच्याकडे डिग्री नसतानाही अवैधपणे आपला वैद्यकीय व्यवसाय चालवत होते. याची माहिती मादळमोही येथील वैद्यकीय अधिकारी अरुण लोकरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासोबत या दवाखान्याची झाडाझडती घेतली. तेव्हा सुनील सेन हा डॉक्टर बोगस असल्याचे त्यांना आढळून आले. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यामध्ये फिर्यादी अरुण आप्पासाहेब लोकरे (वय ३६, वैद्यकीय अधिकारी मादळमोही) यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. ४६४/२०१९, कलम ४२० भा.दं.वि.सह कलम ३३ (२) मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट १९६१ नुसार बोगस डॉक्टरावर कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस हवालदार इंगोले हे करत आहेत.




Source रिपोर्टर