Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पक्षातून मी जाणार नाही, पक्षाला मला सोडायचे असेल तर निर्णय घ्यावा-पंकजा मुंडे



क्षातून मी जाणार नाही, पक्षाला मला सोडायचे असेल तर निर्णय घ्यावा-पंकजा मुंडे
भाजप माझ्या बापाचा पक्ष, मी पक्ष सोडणार नाही, पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, एका पराभवाने मी खचून जाणारी नाही, आता मी लोकांसाठी लढणार आहे, मशाल यात्रा काढणार आहे, आता मला कोअर कमिटीतूनही मुक्त करा, आजपासून कोअर कमिटीची सदस्य नाही, पंकजा गोपीनाथगडावरून कडाडल्या

परळी-शेवटच्या दिवसापर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासठी एक-एक आमदार निवडून यावा म्हणून मी प्रयत्न करत होते. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली होती, मग मी बंड कसा करेल? मी बंड करणार, मी पक्ष सोडणार ही पुडी कोणी सोडली? हे चंद्रकांत दादांनी आता शोधावं. गोपीनाथ मुंडेचे रक्त बेईमानीचे नाही. मी तर पक्ष सोडणार नाही, परंतू पक्षाला काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी अवश्य घ्यावा. मी पदासाठी हापापलेली नाही. मी पदही मागणार नाही. आणि आजपासून मी कोअर कमिटीची सदस्यही राहणार नाही. आता सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसाठी समाजकार्य करणार आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून मुंबईत कार्यालय सुरू करणार असून २७ तारखेला औरंगाबादेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. हे उपोषण मला विरोध करणार्‍यांसाठी नाही तर मराठवाड्याकडे लक्ष वळवण्याासठी करणार असल्याचे सांगत हा पक्ष माझ्या बापाचा आहे. असं म्हणून पंकजा मुंडेंनी पक्षावर हल्लाबोल केला. यावेळी उपस्थितांनी पंकजा मुंडे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणा दिल्या.
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, बबन लोणीकर, प्रकाश मेहता, महादेव जानकर यांच्यासह अनेक आजी माजी आमदार, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पंकजा मुंडे आक्रमक झाल्या. खडसेंनी आपलं मन मोकळं केल्याचे सांगून पंकजा म्हणाल्या, माझे मोठे भाग्य आहे, मी मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला, दुर्भाग्य एवढेच त्यांना मला अग्नीडाग द्यावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय प्रवास जीवंत असल्याचे त्यांनी सांगितले. १ डिसेंबरला पोस्ट केली, १२ तारखेपर्यंत पंकजावरच चर्चा सूरू आहे. १ तारखेअगोदर संजय राऊत टीव्हीवर दिसत होते. त्यांनी जे बोलले ते करून दाखवले. मी छोट्या प्रभावाने खचून जाणारीनाही. माझ्याबाबत जे राजकीय सुत्र आहेत त्या सुत्रांना पवार-फडणवीस एकत्र आले हे कसे कळले नाही. असा तिरकस हल्लाही पंकजांनी माध्यमांवर केला. गोपीनाथ मुंडेंचे रक्त आळणी नाही. पराभवाने मी खचून जाणारी नाही. दारबंद करून लपून बसणार नाही, एकीकडे मी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी एक-एक आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते. मग मी नाराज कशी? मुख्यमंत्री जाहिर झाला होता. मग माझे बंड कसले? आता माझी कोणाकडे अपेक्षानाही, मी कोणाकडे काही मागणार नाही, चंद्रकांत दादा मी पक्ष सोडणार ही पुडी कोणी सोडली? त्या बातम्या कोणी पेरल्या? याचा शोध तुम्ही घ्या आणि याचं उत्तर आता पक्षाने द्यावे. मला पद मिळू नये यासाठी कारस्थाने सुरू आहेत. गोपीनाथ मुंडेचं रक्त बेईमान नाही. आता मी महाराष्ट्राची आहे. आमदार नाही, खासदार नाही, सर्वसामान्य आहे. आता मला कोअर कमिटीमधूनही मुक्त करा, आता मी कोअर कमिटीची सदस्यही राहणारनाही. बहुजन नेता झालेला कुणाला बघवत नाही? देवही जातीवादी आहे का? असा सवाल उपस्थित करत फडणवीसांवर हल्लाबोल केला. आता मी मशाल घेवून राज्यभर दौरा करणार आहे. २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणचे कार्यालय सुरू करणार आहे. २७ तारखेला औरंगाबादेत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. मी पक्ष सोडणार की नाही याचे उत्तर आता पक्षाने द्यावे. ते दिले तरी लोकांच्या मनात शंका आहे. पंकजा मुंडे दबाव आणत असल्याचे काहीजन म्हणत आहे. असे म्हणत स्वर्गात सुध्दा श्री नसेल तर राजाला काही अर्थ नसतो. लक्ष्मी नसेल तर समुद्रमंथन करून बाहेर काढावे लागते. लक्ष्मी हरवली आमची, तोंडचा घास आम्हाला घेता आला नाही. अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कष्टाचे चीज व्हावे असे वाटत होते. पण आता मी काम करणार आहे. असे म्हणून पंकजा मुंडेंनी पक्षावर हल्लाबोल केला.