परळी-भाजपाचे ज्येष्ट दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आज भावनिक पोस्ट करत गोपीनाथरावांना विनम्र अभिवादन केले. धनंजय म्हणतात, आप्पा तुमचाच वारसा चालवत आहे. संघर्षाचा...जनसामान्यांच्या कल्याणाचा...सदैव आपल्या आठवणीत...असे ट्विट करून धनंजय मुंडे यांनी स्व.मुंडेंच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचे छायाचित्र ट्विट केले आहे.
गोपीनाथ गडावर आज स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मेळावा झाला. यावेळी पंकजा मुंडेंनी आक्रमक होत आपली पुढील दिशा महाराष्ट्रासमोर मांडली. तर इकडे स्व.मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी एका ट्विटद्वारे आप्पा (म्हणजेच गोपीनाथराव) तुमचाच वारसा चालवत आहे, संघर्षाचा...जनसामान्यांच्या कल्याणाचा... सदैव आपल्या आठवणीत विनम्र अभिवादन...करत मुंडेंच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झालेला फोटो धनंजय मुंडेंनी ट्विट केला आहे.
झुंजार नेता बीड
पार्श्वभूमी बीड divya marathi beedlokasha beedhello beed lokmatbeed citizenpunyanagari beed dainik lokprashna beed
