Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुणे: पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले म्हणून दुकान लुटले!



 पाण्याच्या बाटलीचे पैसे मागताच भाई असल्याचे सांगत दुकानात घुसून मारहाण करून अज्ञात इसमांनी २० हजार रुपये चोरून नेल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. सय्यदनगर येथे एका जनरल स्टोअर्समध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैय्याज तैफिक अन्सारी (वय २२,रा. सय्यदनगर, ) याने याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फैय्याज याच्या दुकानात गेले. त्यांनी पाण्याची बाटली मागितली. त्यावेळी फैय्याज याने पैसे मागितले. त्यावेळी आरोपींनी भाईला ओळखत नाही का? पैसे मागतोस दुकान चालवायचे नाही का?, असे म्हणत दमदाटी केली. त्यानंतर वजनाचे माप उलचून फैय्याज यांना मारले. दुकानात घुसून गल्ल्यातील २० हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी वानवडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार वानवडी पोलिसांनी इरफान वाहीद अन्सारी (वय २४) याला अटक केली आहे. तर, इतर आरोंपीचा शोध सुरू आहे.