बीड :- दररोज आठ वाजता ऊन पडलेले असते. पण, आज मात्र बीड शहरासह परिसरात सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. धुक्यामुळे रस्तेसुद्धा गायब झाले होते. बीड शहरासह परिसरातही असेच वातावरण असून कुणाच्या तरी अंगावर दिसणारे उबदार कपडे आज सर्वांच्याच अंगावर पाहायला मिळत होते अश्या थंडगार वातावरणात पसरलेल्या गुलाबी थंडीचा मनसोक्त आनंद नागरिक घेत असताना दिसून आले तर दुसरीकडे या वातावरणाचा फटका फुलोर्यात आलेल्या पिकांना बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत पाहायला मिळाला
हिवाळा सुरू होऊन जवळपास महिना झाला. पण अद्याप थंडीला सुरुवात झाली नाही. पण आता वातावरणात गुलाबी थंडी पसरु लागली आहे. त्यातच आज बुधवारी सकाळी धुक्यात हरवल्याचे पहायला मिळाले. बीड शहरासह परिसरात पहाटेपासून धुके पसरले होते.हवेत गारवा होता . मार्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या अनेक नागरिकांनी हे चित्र आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. काहीनी सेल्फी घेत हे क्षण साठवून ठेवले.यावर्षी आजच थंडी बर्यापैकी जाणवत असल्याने अनेकांच्या अंगावर उबदार कपडे पाहायला मिळाले
रब्बी पिकांना फटका
बीड शहरासह अनेक गावात बुधवारी भल्या पहाटेपासून धुके पडले. यामुळे अनेक पिकांच्या फुलोर्यास फटका बसला आहे. रब्बी हंगामातील हरभरा, तूर या पिकांच्या फुलोर्यास मोठा फटका बसला असून यामुळे शेतकर्यांचा फवारणीचा खर्च वाढणार आहे.
(रिपोर्टर)
