संदिप क्षीरसागर- मला आयुष्यातून उठवण्याचा कट रचला जात आहे
मला कुणालाही फसवायचं नाही. मला जनतेची दिशाभूल करायची नाही. मला कधीचेही प्रकरण काढून त्यात गोवण्याचं काम केलं जात आहे. औरंगाबाद येथे 2001 मध्ये माझ्यावर एक गुन्हा दाखल होता. ज्याची माहिती मी माझ्या उमेदवारी अर्जाच्या शपथपत्रात नमूद केली आहे. मात्र निवडणुकीच्या दोनच दिवस आगोदर माझ्या नावे अटक वॉरंट काढून मला आयुष्यातून उठविण्याचा कट केला जात असल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे उमदेवार संदिप क्षीरसागर यांनी केला.
ते बीड येथे राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना संदिप क्षीरसागर म्हणाले, औरंगाबादमधील एका गुन्ह्यात मला 20 वर्षात कधी नोटीस देखील मिळालेली नाही. न्यायालयात हजर न राहील्यामुळे अटक वॉरंट काढण्यात आले. परंतु कालच औरंगाबाद कोर्टाने मला 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजुर केला. हा विरोधकांच्या कटाचा भाग होता. पण न्यायदेवतेन जामीन दिल्यामुळे यांना चपराक मिळाली आहे.
आमच्या काकांनी माझ्या नावे द्वारकादास मंत्री बँकेचे 5 कोटी 78 लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. ती रक्कम त्यांच्याच नावे ट्रान्सफर झालेली आहे. मी कुणावर वैयक्तीक आरोप करीत नाही. मर्यादा पाळतो. पण यांनी मला वैयक्तीक त्रास देण्याचं काम केलं आहे. आमच्या विरोधकांच्या मोठ्या मुलाच्या संपत्तीच्या टॅक्सचे आकडे 2 वर्षात कोटीने कसे काय वाढतात? बोलायला खूप काही आहे पण आता मतदार 21 तारखेची वाट पहात आहेत. 24 तारखेला लक्षात येईल कोण कुणाच्या पाठीमागे आहे, असेही संदीप क्षीरसागर म्हणाले. यावेळी फारुक पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे यांची उपस्थिती होती.
