शिरुर:- तालुक्यातील मानूर जवळील एका वाडीवर अकरा वर्षाच्या एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना आज (रविवार) दुपारी 3.30 वाजता घडली असून अत्याचार झाल्यानंतर मुलीची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारील अशी धमकीही पिडितेला दिली आहे.
ठाकरे मंत्रिमंडळाचा आज नव्या चेहऱ्यांकडं लक्ष
पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी फरार असून याचा तपास स.पो. नि सुरेश खाडे हे करत आहेत
