Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

२०१९ मधील शेवटचं सूर्यग्रहण, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग



आज होणारं सूर्यग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. पण मुंबईत हे ग्रहण खंडग्रास असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सूर्यग्रहणाला सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सुरवात होणार आहे.

२०१९ मधील शेवटचं सूर्यग्रहण २६ डिसेंबरलादेशातील अनेक भागात कंकणाकृती तर मुंबईत खंडग्रास सूर्यग्रहणनासाच्या वेबसाइटवरुन पाहता सूर्यग्रहणाचं लाईव्ह स्ट्रिमिंग
मुंबई: २०१९ सालातील शेवटचं सूर्यग्रहण हे आज (२६ डिसेंबर) सकाळी ८ वाजून ०४ मिनिटांपासून पाहता येणार आहे. हे सूर्यग्रहण भारतासह ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, सौदी अरब आणि सिंगापूरमध्ये दिसणार आहे. दरम्यान, नवी  दिल्ली, पुणे, जयपूर, लखनऊ, कानपूर, नागपूर, इंदूर, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, सूरत भोपाळ, विशाखापट्टणम, लुधियाना आणि आगरा येथून हे ग्रहण आंशिक दिसणार आहे. सूर्य ग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहणं हे हानिकारक ठरु शकतं. मुंबईत हे ग्रहण खंडग्रास स्वरुपात दिसणार आहे. पण ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण पाहण्याची मुंबईकरांची संधी हुकू शकते. पण काळजी करु नका. कारण हे ग्रहण आपण आता ऑनलाइन देखील पाहू शकता.

२६ डिसेंबरचं सूर्यग्रहण हे या वर्षातील तिसरं सूर्य ग्रहण आहे. जे अनेक चॅनलद्वारे यूट्यूबवर लाइव्ह पाहता येणार आहे. सूर्य ग्रहण आपण ऑनलाइन नेटवर्क Slooh.com पाहू शकता. जिथे याचं लाइव्ह स्ट्रिमिंग सुरु आहे.


इथे पाहा आजच्या सूर्यग्रहणाचं लाईव्ह स्ट्रिमिंग :



सूर्य ग्रहणाची वेळ: 

हे सूर्य ग्रहण २६ डिसेंबर म्हणजेच पौष महिन्यातील अमावस्येवर सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सुरु होणार आहे. जे १० वाजून ५७ मिनिटांनी संपणार आहे. या वर्षीचं दुसरं सूर्यग्रहण हे भारतात दिसलं नव्हतं. पण तिसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण हे भारतात दिसत आहे. 

या ग्रहणाला का म्हणतात 'रिंग ऑफ फायर'

२६ डिसेंबरला सूर्यग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण मानले जात आहे. मूळ रुपात याचा अर्थ सूर्य आणि चंद्र एकावेळी 'रिंग ऑफ फायर'च्या पोजिशनमध्ये एकत्र येणार आहे. यात चंद्र सूर्याला संपूर्ण कव्हर नाही करणार तर संपूर्ण सूर्यग्रहणावेळी सूर्य आणि पृथ्वीमध्ये चंद्र हा आल्यावर सूर्याला संपूर्ण झाकणार नाही तर त्याच्या परिघाच्या बाहेर एक रिंग सारखा आकार येणार आहे.

२०२० मध्ये किती ग्रहण असणार?

२०२० मध्ये एकूण ६ ग्रहणं असणार आहेत. ज्यापैकी ४ चंद्र ग्रहणं असणार आहेत. तर २ सूर्य ग्रहणं असणार आहेत. या वर्षीचं पहिलं चंद्र ग्रहण हे १० जानेवारीला असणार आहे. तर २०२० मधील पहिलं सूर्य ग्रहण हे २१ जून रोजी असणार आहे. तर दुसरं सूर्यग्रहण हे १४ डिसेंबराल सुरु होणार असून ते १५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.