बेलापूर गावातील एका नामांकित कॉलेजला इयत्ता १२ वीला हा शिक्षक गणित विषय शिकवतो . सदर शिक्षकाने एका विद्यार्थिनीस माझ्या हातात १२ वी परीक्षेचे इंटरनल ( अंतर्गत ) मार्क आहेत ते तुला पाहिजे असतील तर तु माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेव, अशी शिक्षकी पेशेला काळीमा फासणारी मागणी या नालायक शिक्षकाने या विद्यार्थिनीकडे केली.
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए हा कायदा आणल्याने या कायद्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
१२ वी सायन्सला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकांच्या या मागणीचा मोठा धक्का बसला . रविवारी कॉलेजला सुट्टी होती . तेव्हा दुपारी ही मुलगी घरी रडत होती . सदर मुलीची आई दवाखान्यात नोकरीला असल्याचे समजते . आपली मुलगी का रडत आहे म्हणून आईने या मुलीला आपल्याजवळ घेतले आणि तिला विश्वासात घेवून नेमके काय झाले ? तू का रडते ? असे विचारले असता सदर मुलीने आपल्या गणिताच्या शिक्षकाने आपणाकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे आईला सांगितले.
हे पण वाचा : - साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानात कामाला होते
हे ऐकून आईलाही मोठा मानसिक धक्का बसला . आता नेमके काय करावे ? असा प्रश्न या माऊलीला पडला . त्यांनी आपल्या भावाला ही गोष्ट सांगितली . मुलीच्या मामाचे गावात काही सामाजिक कार्यकत्यांशी संबंध होते . त्यांनी तातडीने त्यांना फोन करुन ही हकीगत सांगितली. तेव्हा त्यांनाही धक्का बसला. सदर प्रकार संस्था चालकांपैकी तिघांना सांगण्यात आला. त्यात बेलापूरचे दोन माजी सरपंच आहेत. सदर प्रकार ऐकून त्यांनाही धक्का बसला.हे पण वाचा : - पुणे: सावत्र बापच गेल्या दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला मार्शलने शाळेत धाव घेतली.
त्यानंतर सदर मुलीला प्राचार्यानी बोलावून घेतले . मुलीने आपल्याबरोबर घडलेला प्रकार प्राचार्यासमोर जसाच्या तसा सांगितला,त्यानंतर सदर शिक्षकाला त्या ठिकाणी बोलाविण्यात आले . मात्र सदर शिक्षकाने पहिले हात वर केले. आपणावर खोटा आरोप करत असल्याचे तो म्हणाला. मात्र त्याचे पूर्वीचे काही प्रताप माहीत असल्याने त्याला काहींनी प्रश्न विचारले त्यानंतर संस्था चालकांपेकी उपस्थित असणाऱ्या तिघांनी सदर शिक्षकाला धारेवर धरले. त्यानंतर मात्र सदर शिक्षकाने आपली चूक झाल्याचे सर्वासमोर मान्य केले.
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा आणला आहे, एनआरसी कायदा रद्द करा
Source AhmednagarLive
