औरंगाबादेतील नियोजन बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष
गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात दुर्लक्षित केलेल्या मराठवाड्याला न्याय देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार आज मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे नियोजन करणार असून दुपारी अडीच वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह आठ जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार असून दुष्काळ, सिंचन, शिक्षण, आरोग्य यासह जनतेच्या मुलभूत गरजांसह शासनाच्या विविध योजना राबवण्याबाबत बैठकीत चर्चा होऊन पुढील वर्षाच्या विकासासाठी जिल्हानिहाय निधी या बैठकीत मंजूर होण्याची दाट शक्यता आहे.हे पण वाचा : -विष प्राशन केल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठवाड्याच्या नियोजनाची बैठक आज औरंगाबादेत बोलावली आहे. या बैठकीसाठी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहत असून आपआपल्या जिल्ह्यातील विकास कामाला लागणारा निधी दुष्काळात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेपनासाठी लागणारा निधी यासह अन्य प्रमुख गोष्टींवर चर्चा होणार आहे. गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यात ५५ टक्केपेक्षा जास्त निधी अखर्चित राहिला असल्याने हा निधी बीड जिल्ह्यासाठी मिळणर का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी मराठवाड्याच्या विकासासह दुष्काळाबाबत दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत उपोषण केलं, त्यांनी काही मागण्या केल्या, या मागण्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सातत्याने पडत असलेला दुष्काळ, शेतीचे प्रश्न, शेतकर्यांची आर्थीक डबघाई, शेती मालाला मिळत नसलेले भाव यासह अन्य गंभीर प्रश्नांवर चर्चा होऊन जिल्हानिहाय जिल्हा वार्षिक आराखड्याला या बैठकीत मंजूरी देण्यात येणार आहे. अजित पवाारांनी मराठवाड्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ही बैठक बोलवली असल्याने मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्याला मिळवं यासाठी या बैठकीत चर्चा होऊन त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : - बीड :- शहरातील फुलाईनगर भागाच्या हद्दीत असलेल्या काळे यांच्या मळ्यातील विहिरीमध्ये रात्री दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली
अजित पवारांना पुस्तक भेट आणलेल्या ‘त्या’ अधिकार्यांवर कारवाई
औरंगाबाद (रिपोर्टर):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी पुस्तक भेट आणलेल्या नियोजन विभागाच्या उपायुक्तांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली आज मराठवाडा नियोजन विभागाची बैठक सुरु आहे. आठही जिल्ह्यांचा ते आढावा घेत आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक सुरु आहे.
हे पण वाचा : - बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्या
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी पुस्तक मागविले होते. पुस्तकाला प्लॅस्टिकचे आवरण असल्याने महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. पुस्तक भेट घेऊन येणार्या नियोजन विभागाचे उपायुक्त रवी जगताप यांना याबद्दल ५ हजार रुपयांचा दंड केला आहे.पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्यावर असतानामराठवाडा शिवसेना पदाधिकारी पुष्पगुच्छ आले होते. मात्र, त्याला प्लस्टिक गुंडाळल्याचे निदर्शनास येताच महापालिका आयुक्त पांडेय यांनी शिवसेनेचे लातूर उपजिल्हा प्रमुख आणि जालन्याचे तालुका प्रमुख या दोघांना दंड केला होता. आता थेट वरिष्ठ अधिकार्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
रिपोर्टर
