Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठवाडा दुष्काळमुक्तीचा नारा देत पंकजांचं उपोषण सुरू



औरंगाबाद :- मराठवाडा दुष्काळमुक्तीचा नारा देत मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे म्हणून तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज औरंगाबादेतील आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले असून उपोषणस्थळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केेंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह
हे पण वाचा : - नववधू म्हणाली मी माझ्या प्रियकराची अमानत आहे, मला स्पर्श करु नका…


मराठवाड्यातील आजी-माजी आमदार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हे उपोषण सत्तेविरुद्ध नसून अपेक्षेचं उपोषण असल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले. तर दुसरीकडे भाजप सरकारने मराठवाड्यात राबवलेल्या योजना विद्यमान सरकारने रद्द केल्या तर मोठी लढाई लढू असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.   गोपीनाथ गडावरून पक्षाला आव्हान देत २७ तारखेला मराठवाड्यातल्या
हे पण वाचा : - बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या


दुष्काळाबाबत आणि पाणीप्रश्‍नाबाबत उपोषण करणार असल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले होते. हे उपोषण गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या बॅनरखाली केले जाईल, असेही म्हटले होते. मात्र नंतर पंकजा मुंडे यांनी हे उपोषण आपल्या नेतृत्वात आणि बॅनरवर भाजपाच्या नेत्यांचे फोटो टाकून आज सुरू केले. पंकजा मुंडेंच्या या उपोषणाला उत्स्पफूर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळी आयुक्त कार्यायासमोर उपोषणाला सुरुवात झाली. तेव्हा सुरुवातीपासूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासह भाजपाचे आजी-माजी आमदार उपोषणस्थळी उपस्थित होते. मराठवाड्यातून मोठ्या संख्ेयने भाजपाचे कार्यकर्ते यांच्यासह मुंडे समर्थक उपोषणस्थळी जमले होते. अमर रहे.. अमर रहे.. गोपीनाथ मुंडे अम रहे... च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. उपोषणस्थळी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, रासपचे महादेव जानकर, खा. प्रीतम मुंडे, प्रशांत बंब, राजेंद्र मस्के, रमेश आडसकर यांच्यासह मराठवाड्यातील भाजपाचे आजी-माजी आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा : - बीड :- शहरातील फुलाईनगर भागाच्या हद्दीत असलेल्या काळे यांच्या मळ्यातील विहिरीमध्ये रात्री दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली