Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीड पालीकेने घरपट्टी, पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी- पप्पु कागदे



बीड,-सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णताः विस्कटली आहे. त्यामुळे त्यांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशी परिस्थिती ओढावल्याने बीड नगर परिषदने मार्च ते मे या तीन महिण्यांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णताः माफ करावी, अशी मागणी हाती घेवून युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासह बीड नगर परिषदचे अध्यक्ष तसेच बीड पालिकेचे सीओ यांना भेटणार आहेत.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पप्पु कागदे यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनामुळे जगासमोर एक मोठे संकट उभा राहिले आहे. त्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य लोकांना अधिक बसला आहे. देयात गेल्या मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजगार, उद्योगधंदे, दळणवाहतूक पूर्णपणे बंद आहे. असे झाल्याने लोकांच्या हाताला कामधंदा नाही, म्हणून परिस्थिती आणखीणच बीकट झाली आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टी गांगीर्याने घेत, शहर नागरीकांची तीन महिण्यांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्याकरिता आपण बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, बीड पालिकेचे अध्यक्ष आणि सीओ यांना आपण सोमवारी भेटणार आहोत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व पालिकेंच्या हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यासाठी देखील आपण तेथील प्रशासनाशी बोलणार आहोत.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पप्पु कागदे यांनी असेही म्हटले आहे की, शहरात किरायाने राहणार्‍या सर्वसामान्य कुटुंबांना घरभाडे देण्याचा तगादा घरमालकांनी लावू नये. कारण सध्याची परिस्थिती लक्षात घेता, त्यांच्याकडून टप्प्या-टप्प्याने घरभाडे घेण्यात यावे. ज्या घरमालकांची परिस्थिती सदन आहे. अशा घरमालकांनी माणुसकी दाखवत तीन महिन्यांचे घरभाडे माफ करीत सामाजिकता जोपासावी असी विनंतीही युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांनी केली आहे.



beedreporter

जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी..