Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुण्यात १७ नर्स, तीन डॉक्टरांना करोनाची लागण



पुणे: रुबी हॉल क्लिनिकमधील १७ परिचारिका, तीन डॉक्टर, वॉर्डबॉय यांच्यासह तब्बल २५ जणांना 'कोविड १९' ची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बोमी भोट यांनी ही माहिती दिली. रुबी हॉल क्लीनिकमधील १ हजार जणांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल नुकताच आला. 
त्यातून २५ जण पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. आरोग्य सेवकांना होत असलेल्या संसर्गामुळं चिंतेचं वातावरण आहे. मुंबईनंतर राज्यात सर्वाधिक करोना रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यातही पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आतापर्यंत ७५६ वर पोहोचली आहे. त्यात पुणे शहरातील ६४७, पिंपरी चिंचवड ५८, पुणे ग्रामीण २४ आणि पुणे कँटोन्मेंट- जिल्हा रुग्णालय २७ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात काल एका दिवसात ८७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात पुणे शहरातील ८५ तर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाचा समावेश होता. आतापर्यंत १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

वाचा: