Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरमार्गे जिल्ह्यात कोरोनाची घुसखोरी - Beed Reporter Today News


बीड आष्टी :  काल-परवापर्यंत एकही कोरोना बाधीत रूग्ण नसलेल्या बीड जिल्ह्यात रात्री अचानक एक रूग्ण बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला. अन जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. आष्टी तालुक्यातील पिंपळा कोयळा येथील 63 वर्षीय इसमास कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले असून त्या रूग्णावर नगर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. बाधीत व्यक्तीच्या कुटूंबातील तिघांसह त्याच्या संपर्कातील अन्य तिघांनाही आरोग्य विभागाने बीड जिल्हा रूग्णालयात खबरदारी म्हणून दाखल केले असून त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सुरूवातीपासून दक्ष असलेल्या बीड जिल्ह्यात नगर मार्गे कोरोना आल्याने बीड जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासन अधिक सतर्क झाले असून पिंपळा कोयळा सह परिसरातील तीन कि.मी.अंतरावरील सर्व गावे कोरोना झोन म्हणून सील करण्यात आले असून सात कि.मी.अंतरावरील गावातही कडक संचारबंदी लागु करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे दहा पथके या सर्व गावात जावून तपासणी करणार आहेत. जोपर्यंत प्रशासनाचा पुढील आदेश येत नाही. तोपर्यंत परिसरातील दहा गावे अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत.
आष्टी तालुक्यातील पिंपळा कोयळा येथील दोघेजण हे नगर येथे काही दिवसापूर्वी जमातीसाठी गेले होते. त्या दोघांनी 23 मार्च पासून नगरमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर हे दोघे चार दिवसापूर्वी बीड जिल्ह्यात दाखल झाले होते. आरोग्य प्रशासनाने नगर येथूनच त्यांचे स्वॅब पुण्यातील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील एक जणाचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून दुसर्‍याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. रात्री उशिरा जेव्हा जिल्ह्यातला एक रूग्ण बाधीत आल्याची माहिती प्रशासनाला झाली तेव्हा प्रशासनाने अधिक सतर्क होत पुढील पाऊले उचलायला सुरूवात केली. आज सकाळी जेव्हा शहरासह जिल्ह्याला या घटनेची माहिती झाली तेव्हा प्रचंड खळबळ उडाली. काल-परवा पर्यंत एकही कोरोना बाधीत रूग्ण बीडमध्ये नव्हता. आता नगरमार्गे तो आष्टी तालुक्यातील पिंपळा गावात आढळून आल्याने या परिसरातील इतर गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून कलम 144 नुसार पिंपळा गावाचा तीन कि.मी.परिसर हा कोरोना झोन म्हणून घोषीत केला आहे. यामध्ये पिंपळा, सुंभेवाडी, धनगरवाडी, काकडवाडी, ढोकळसांगवी, खरडगव्हाण अशा एकूण सहा गावांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुढील 4 कि.मी.अंतर असलेले आष्टी तालुक्यातील लोणी, नांदूर, सोलापूरवाडी, कुंटुफळ, कोयाळ ही पाच गावे बफर झोन म्हणून घोषीत केले आहेत. यापूढे आरोग्य प्रशासन सात कि.मी.अंतरावरील सर्व गावातील लोकांची तपासणी करणार आहे. आरोग्य प्रशासन सध्या या भागात तळ ठोकून असून पिंपळा कोयळा हे गाव बीड-नगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या परिसरातून जास्त प्रमाणात नगरमध्ये ये-जा होत असते. 
आरोग्य प्रशासन तळ ठोकून
कोरोना बाधीत रूग्ण आष्टी तालुक्यातल्या पिंपळा येथे आढळून आल्यानंतर भल्या सकाळपासून आरेाग्य प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी या भागात तळ ठोकून असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील? आणि सर्दी पडस्यासह खोकला असलेल्या नागरिकांची तपासणी कशी करता येईल याकडे प्रशासनाचे लक्ष आहे.
दुसर्‍याचा अहवाल आला निगेटीव्ह
1 मार्च ते 7 एप्रिल कोरोनाबाधीत एकही रूग्ण जिल्ह्यात नव्हता. आरोग्य विभागाकडून आतापर्यंत शंभर जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 98 स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला. रात्री उशिरा मात्र एक जण पॉझीटीव्ह निघाला. तर अन्य एक जणाच्या नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
कोरोनाग्रस्ताची गावात किराणा दुकान
पिंपळा येथील ज्या व्यक्तीला कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्या व्यक्तीची गावात किराणा दुकान असल्याने किती लोकांचा संपर्क दुकानावर झाला असेल. हा व्यक्ती किती जणांच्या सहवासात आला असेल. याने गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र किराणा दुकान दोन महिन्यापासून बंद असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे.
Corona infiltration into the district through the city Beed