Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

BMC नर्सिंग होम सुरू करा, अन्यथा परवाने रद्द


मुंबई: मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेच्या बहुतेक रुग्णालयात करोनाच्याच रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे इतर रुग्णांची गैरसोय होत असून नर्सिंग होम आणि खासगी डॉक्टरांनीही त्यांचे दवाखानेही बंद ठेवल्याने रुग्णांची आणखीनच गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर नर्सिंग होम (शुश्रुषा गृह, पॉलिक्लिनिक) चालक आणि खासगी डॉक्टरांना मुंबई पालिकेने सक्त ताकीद दिली आहे. नर्सिंग होम सुरू न केल्यास नर्सिंग होमचे परवाने रद्द करण्यात येईल, असा इशारा देतानाच खासगी दवाखाने सुरू न करणाऱ्या डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला या नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. सोसायटी आणि चाळीच्या आवारात असलेले नर्सिंग होम किंवा खासगी दवाखाने सुरू करण्यास सोसायटी, चाळीतील रहिवाशी, घरमालक किंवा शेजाऱ्यांनी अडथळा आणल्यास त्यांच्यावरही साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करतानाच त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही परदेशी यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. मुंबईतील सर्वच्या सर्व नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही पालिकेच्या २४ विभागातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान जे नर्सिंग होम बंद असल्याचे आढळून येतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू करावी. तर जे खासगी दवाखाने बंद आढळून येतील, त्यांची माहिती घेऊन संबंधित डॉक्टर किंवा दवाखाना उघडण्यात अडथळा आणणाऱ्यांवर 'एपिडेमिक ॲक्ट १८९७' नुसार कारवाई सुरू करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याच्या खातेप्रमुखांद्वारे म्हणजेच 'कार्यकारी आरोग्य अधिकारी' यांच्याद्वारे विभागस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचं पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.


जाणून घेऊया करोना संदर्भातील ताज्या घडामोडी..


'लॉकडाऊन'मध्ये लग्नाचा बस्ता; अठरा जणांवर गुन्हा
बीड पालीकेने घरपट्टी, पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी- पप्पु कागदे
नगरमध्ये बंदोबस्तावरील पोलिसाला डंपरने उडविले!

'मोदी सरकारने इतकी मोठी गफलत कशी केली?'

राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५६४९

अहमदनगर ताज्या बात्म्या : नगरसेवकासह १८ जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह !

घरगुती तक्रारी असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा केज पोलिसांची मोहीम