Beed News Beed Reporter News Maharahstra News Live news
मुंबई: राज्यातील करोनाबाधितांचा आकडा रोज नवनवा उच्चांक गाठत आहे. काल एका दिवसात राज्यात तब्बल ३५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आतापर्यंत २५९ रुग्णांवर उपचार होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी... लाइव्ह अपडेट्स: >> आनंद परांजपे हे सध्या 'होम क्वारंटाइन' असलेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात होते. पक्षाच्या व अन्य कामानिमित्त आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांची ये-जा असायची. आव्हाड यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनाही झालीय करोनाची लागण >> माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांना करोनाची लागण >> आतापर्यंत २५९ करोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज >> महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा २६८४ वर
