Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीडच्या बंद दारात जिल्हाधिकारी यांनी उघडली खिडकी



बीड - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे मात्र 20 एप्रिलपासून नियमांमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यासाठी सुधारीत आदेश जारी केले आहे. हे आदेश येत्या 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण जिल्ह्याला लागू राहणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी लागू करण्यात आलेले जमावबंदी, संचारबंदी आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.
सर्व प्रकारची आरोग्य सेवा 24 तास सुरू राहणार असून कृषिविषयक सर्व कामांसाठी दिवसभर परवानगी असणार आहे. बँकांच्या शाखा लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नियमीतपणे सुरू राहतील. एटीएम सेवा सुरू राहतील. डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅस, तेल कंपन्या सुरू राहणार आहेत. टपाल सेवा, पोस्ट ऑफीस व टँकरने पाणीपुरवठा सुरू राहणार असून सर्व प्रकारच्या वस्तूंच्या माल वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्राहकसेवा केंद्र चालू ठेवता येणार आहे. कुरिअर सेवा, फरसान, मिठाई, दुकाने सुरू राहतील. किराणा दुकान, रेशन दुकान, फळे, भाजीपाला, डेअरी, दुध केेंद्रे, कोल्ड्रींक, मांस, मच्छि दुकाने, वैरन चारा यासाठीच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. सर्व मालवाहतूक करणारी वाहने ज्यामध्ये दोन वाहक व एक मदतनिस असेल, यांना परवानगी देण्यात आली आहे. आरोग्य, कृषि, मत्स्य व्यवसाय, पशूसंवर्धन, बँकिंग सेवा, ऑनलाईन शिक्षण, मनरेगा कामे, मालवाहतूक, बांधकाम क्षेत्र, उद्योग तसेच खासगी आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ग्रामपंचायत स्तरावरील शासनमान्य ग्राहकसेवा, कुरिअर सेवा, शितग्रहे, गोदाम सेवा, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी तसेच वैद्यकीय आणि आपतकालीन वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी हॉटेल, लॉजही सुरू राहतील. विद्युत वितरण निर्मितीसाठी ट्रान्सफार्मर उपकरणे दुरुस्ती दुकानेही सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्ह्यात कृषी व कृषीविषयक कामे सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे शेतकरी व शेतमजूरांकडून करण्यात येणारी शेतीविषयक विविध कामे दररोज पूर्ण दिवस करता येणार आहे. किमान आधारभूत संस्थांचा ज्यात तूर, कापूस, हरभरा यांचा समावेश असेल. कृषीविषयक वस्तू सेवांची खरेदी-विक्री करणार्‍या संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच शेतकरी व शेतकरी समुहांकडून खरेदी करणारे केेंद्रे व गावपातळीवर खरेदीला प्रोत्साहन देणारे केंद्रे दररोज पूर्णवेळ सुरू राहतील. कृषी यंत्रांची दुकाने, किटकनाशके, बियाणे, खत विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. प्रसार माध्यमांसह इलेक्ट्रॉनिक मिडीया ज्यामध्ये डीटीएच आणि केबल सेवांचा समावेश तथापि वृत्तपत्र, दैनिक, मासिके यांचे घरपोच वितरण करता येणार नाही. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा ज्यामध्ये 50 टक्के कर्मचार्‍यांचे संख्येनेच कार्यरत असावेत. माहिती संकलन तसेच कॉल सेंटरमध्ये कमीत कमी कर्मचारी संख्या ठेवून चालू ठेवता येतील. कार्यालय तसेच कॉम्प्लेक्स याकरिता खासगी सुरक्षा पुरविणार्‍या संस्थांना परवानगी, सर्व कृषी फलोत्पादन संबंधीत पॅकिंग व वाहतुकीला परवानगी.

या ठिकाणी बंदी कायम
जिल्हांतर्गत व राज्यांतर्गत हालचाली बंद राहतील
सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था बंद राहतील
सार्वजनिक वाहतुकीकरिता होणारी बस वाहतूक बंद राहील
रेल्वे सेवा बंद, रिक्षा, ऑटोरिक्षा बंद,
चित्रपटगृहे, मॉल्स, खरेदी संकुले, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे बंद राहतील.
अंत्यसंस्काराला 20 पेक्षा जास्त लोकांच्या जमावाला परवानगी नाही

जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्यास परवानगी
जिल्हाधिकारी यांनी नवीन नियमावलीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि निर्मिती करणार्‍यास परवानगी दिली आहे. ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे प्रकल्प (दररोज पूर्ण दिवस त्यावर चालणारे घाऊक तसेच किरकोळ दुकाने, किराणा दुकान, राशन दुकान, स्वच्छता विषयक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने, फळे, भाजीपाला, डेअरी, दूध केंद्र, पोल्ट्री, मास, मच्छी दुकाने, वैरणचारा यासाठीच्या दुकानांना दिवसभर परवाना देण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये याकरिता वरील दुकानदारांनी घरपोच सेवा पुरवण्यास जास्तीत जास्त भर द्यावा, असेही आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे शिधापत्रिकाधारक
व स्वस्त धान्य दुकानदार यांचे साठी आवाहन
रेशन कार्ड ( शिधापत्रिका )पोर्टेबिलिटीसाठी दुकानदारांच्या अंगठ्याचा सॉफ्टवेअरमध्ये बंद करण्यात आला आहे. पोर्टेबिलिटी म्हणजे रेशन कार्ड धारक कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य मिळवू शकतो. परंतु रेशनकार्ड धारक अजूनही अंगठा वापरुन रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा घेऊ शकतात. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जेव्हा कार्ड धारकाचा अंगठा वापरला जातो तेव्हा स्वस्त धान्य दुकान मालकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की अंगठा साबणाच्या पाण्याने किंवा सेनिटायझर व्यवस्थित स्वच्छ केला गेला आहे.

रिपोर्टर