कोरोनानंतर आता चिमुरड्यांना अज्ञात आजाराचा विळखा, 3 मुलांचा मृत्यू
(unknown disease in children)- (coronavirus update)
5 महिन्यांपासून जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरसलाच अद्याप पूर्णपणे ओळखता आलं नाही, त्याचा अभ्यास अद्यापही सुरूच आहे. काही लहान मुलांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाल्याची प्रकरणं समोर आलीत, त्यात आता कोरोनानंतर एका अज्ञात आजारानंही या चिमुरड्यांना विळखा घातला आहे. अमेरिकेत शंभरपेक्षा अधिक लहान मुलांना या अज्ञात आजाराची लागण झाली आहे, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. फक्त न्यूयॉर्क शहरातच 73 पेक्षा जास्त रुग्ण आहेत.
सुरुवातीला हा आजार कोरोनासंबंधित असल्याचं मानलं जात होतं. मात्र न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्रयू क्योमो यांनी सांगितलं की, "या अज्ञात आजारानं ग्रस्त असलेल्या बहुतेक मुलांना श्वसनसंबंधी समस्या असल्याची लक्षणं नाहीत". न्यूयॉर्क जीनोम सेंटर आणि रॉकफेलर युनिव्हर्सिटी एकत्रितरित्या या आजाराचं कारण शोधण्याचं प्रयत्न करत आहेत.

