औरंगाबाद बातम्या
शहरात आज 60 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1022 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4).
तसेच हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर, गल्ली नं. पाच (1), हिमायत बाग, एन-13 सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1), रोशन गेट (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला व 33 पुरुषांचा समावेश आहे.
शहरातील कोरोनाबाधित असलेल्या मदनी चौकातील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा 17 मे रोजी सायंकाळी सहा वाजता, पैठण गेट येथील 56 वर्षीय महिला रुग्णाचा 18 मे रोजी मध्यरात्री साडे बारा वाजता आणि बुड्डी लेन येथील 42 वर्षीय पुरूष रुग्णाचा दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मृतांचा आकडा 34 वर पोहचला आहे.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर