Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भारत, रशियासह 62 देश एकवटले । 62 countries including India and Russia came together


International News । आंतराष्ट्रीय बातम्या

⚡ कोरोनाच्या निर्मितीची निष्पक्ष चौकशी व्हावी या ऑस्ट्रेलियाच्या मागणीला जवळपास 62 देशांनी पाठिंबा दिला आहे. भारत, जपान, रशिया या देशांचाही यामध्ये समावेश आहे. सर्वच देशांचा चीनवर रोष आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. 

💁‍♂️ पाठिंबा : या देशांमध्ये आफ्रिकन समुहाचे 54 सदस्य देश चौकशी ठरावाचा को-स्पॉन्सर असतील. याशिवाय युरोपियन युनियनमधील 27 देश आणि ब्राझिल, दक्षिण कोरिया, मेक्सिको, तुर्की आणि न्यूझीलंडनेही या ठरावाला पाठिंबा दिला आहे.

👀 धमकी : ठरावाच्या माध्यमातून निष्पक्ष, स्वतंत्र व सर्वसमावेशक चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या ठरावात कुठेही चीनचा उल्लेख केलेला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाच्या पुढाकारामुळे चीन मात्र संतापला आहे. चीनने ऑस्ट्रेलियाला बिफ आयातीवर बंदी घालण्याची धमकी दिली देऊन इतर आयात होणाऱ्या वस्तूंवर कर वाढवण्याचाही इशारा दिला आहे.

👉🏻 सोमवारी रात्री होणाऱ्या जागतिक आरोग्य परिषदेच्या बैठकीत ऑस्ट्रेलियाकडून आरोग्य मंत्री ग्रेग हंट हे प्रतिनिधित्व करणार आहेत.

📌 अमेरिकेचा हल्लाबोल : कोरोनाच्या प्रसाराला चीनच जबाबदार असल्याचे सांगत अमेरिकेकडून चीनविरोधात हल्लाबोल सुरु आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी चीनवर एक मोठा आरोप केला आहे. कोरोनाचा प्रसार कसा होतो हे चीनला माहित असूनही त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या लोकांना इतर देशात जाऊ दिल्याचा आरोप त्यांनी केला.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर