बीड बातम्या | आष्टी
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले 7 जण कोरोनाग्रस्त सापडले. त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी गावात जाऊन आज (दि.18) परिस्थितीचा आढावा घेतला.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बोटावर मोजण्याइतकेच लोकप्रतिनिधी रस्त्यावर दिसून येतात. त्यापैकी आमदार सुरेश धस हे एक आहेत. आष्टी तालुक्यातील एकाच कुटुंबातील सात जण आढळल्यानंतर हादरा बसला होता.
7 कोरोनाग्रस्तापैकी आज एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी गावात जाऊन परिस्थीतीची माहिती घेत ग्रामस्थांनी सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या.
त्याचप्रमाणे पोलीस व प्रशासन यांच्याकडून केलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेतली. तालुक्यातील नागरीकांची जबाबदारी आता वाढली आहे. सर्वांनी काळजी घ्या, घरातच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन आमदार धस यांनी केले आहे.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर