एसटीचा गोंधळ कायम; मोफत बस प्रवास सेवा अखेर स्थगित
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वसतीगृहाच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात रखरखत्या उन्हात एक नवजात अर्भक सापडलं.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारपासून मजूर, विद्यार्थी, भाविक आणि अडकलेल्या लोकांसाठी प्रवास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. ही सेवा काही कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून येत्या काही दिवसांत सेवेबाबत निर्णय अपेक्षित आहे.
आयसोलेशन आणि क्वारन्टाइन कालावधी कमी केल्याने लक्षणं नसलेल्या पेशंट्सना घरी सोडणार येईल.
त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली. दरम्यान, एसटीची कोणतीही सोय सुरू नाही, असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील बोरिवली येथील नेन्सी कॉलनी आगारात आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळं एसटी कर्मचारी आणि गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत. एसटीची मोफत सेवा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही, असं सांगण्यात आलं होतं.
