Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

🎈लॉकडाऊनमध्ये कंडोमची दुप्पट मागणी


लॉकडाऊनपूर्व काळात एका महिन्याला गर्भनिरोधक गोळ्यांचे चार ते पाच डब्बे विकले जायचे मात्र आता आठवड्याला 10 पेक्षा अधिक डब्यांची विक्री होत असल्याची माहिती एका फार्मासिस्टने दिली आहे.

🏥दिल्लीतील हिंदुराव रुग्णालयाचे (Hindurao Hospital)  सीएमओ आणि मानसिक रोगाचे डॉक्टर जितेंद्र कुमार म्हणतात लॉकडाऊन काळात कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढणे सामान्य आहे.

👩‍❤️‍👨लोक तणावमुक्त असल्याने आणि भरपूर वेळ मिळत असल्याने लैंगिक जीवनाचा आनंद घेत आहेत यात काही वावगे नाही. गाझियाबाद येथील ‘अपोलो फार्मसी’च्या फार्मासिस्टने याबाबत माहिती देताना सांगितले की,


💊लॉकडाऊन लागू झाल्यापासून अँटी बायोटिक्स (antibiotics medicine) औषधांची मागणी घटली आहे. मात्र कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि गर्भचाचणी करण्याच्या किट्सच्या विक्रीत वाढ झाली आहे.


 
🎈अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम (Condom) आणि गर्भचाचणी किट्सची मागणीही वाढल्याची माहिती त्यांनी दिली. लॉकडाऊनच्या आधी अँटी बायोटिक्स(antibiotics Medicine) गोळ्यांची विक्री जोमात सुरू होती,

👛💊मात्र लॉकडाऊन काळात यात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. या काळात डोकेदुखी आणि अंगदुखीच्या गोळ्या, जेल, स्प्रे यांची मागणी वाढल्याचे त्यांनी सांगितले.