Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

करोना तपासणीचे निकष पाळले नाहीत; 'त्या' रुग्णाची होणार पुन्हा तपासणी!



अहमदनगर: येथून लिंगदेवयेथे आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल खासगी लॅबकडून देण्यात आला खरा. मात्र, स्वॅब घेताना योग्य निकष पाळले नसल्यामुळे त्या व्यक्तीचा पुन्हा स्वॅब घेऊन चाचणी करण्यात येणार आहे. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ७४ झाली आहे.
💁‍♂️ किल्लेधारूर परिसरात पाण्याअभावी मोराचा मृत्यू
मुंबईमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आता मुंबईवरून जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची संख्याही वाढली आहे. लिंगदेव येथेही एक व्यक्ती मुंबईहून परतली होती. संबंधित व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात आले होते. दहा दिवस झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीला त्रास जाणवू लागल्याने त्याने खासगी हॉस्पिटलमधून घशातील स्त्राव चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेकडे पाठवला.
🚑 बीडमध्ये रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक
या प्रयोगशाळेने त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. मात्र, संबंधित व्यक्तीची स्त्राव चाचणी नमुना घेताना योग्य ते निकष पाळले गेले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले व तातडीने संबंधित व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
💥 जंगली प्राण्यांचे मांस खाण्यावर पाच वर्षांसाठी बंदी
आता या व्यक्तीची पुन्हा स्त्राव चाचणी करण्यात येणार असून त्यानंतरच संबंधित व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे किंवा नाही, हे प्रशासनाकडून अधिकृतरित्या सांगण्यात येणार आहे. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना करोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे.