दारु बनवण्याचे साहित्य पोलीसांनी जप्त केले या प्रकरणी तिघां जणांना ताब्यात घेण्यात आले. लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये हातभट्टी दारु विक्रीत वाढ होत असल्याचे दिसून येवू लागले. पोलीस प्रशासनाने आतापर्यंत अनेक हातभट्टी अड्यावर धाडी टाकून दोषी विरोधात गुन्हे दाखल केले.
बीड शहरातील सुभाष रोड लगत असलेल्या पात्रुड गल्ली येथे गेल्या अनेक महिन्यापासून हातभट्टी दारुचा व्यवसाय सुरू आहे. या दारु अड्यावर आज सकाळी शहर पोलीसांनी धाड टाकून ३० ते ३५ हजाराचे रसायन नष्ट केले. यात तिघां जणांना ताब्यात घेण्यात आले. हातभट्टी दारु बनवण्याचे साहित्य पोलीसांनी जप्त केले आहे.दरम्यान अनेक महिन्यापासून सदरील ठिकाणी हातभट्टी दारु अड्डा सुरू आहे. मात्र तरीही या ठिकाणी कारवाई होत नव्हती. वरिष्ठांच्या आदेशानूसार शहर पोलीसांनी कारवाई केली असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान शहर ठाण्याचे पो.नि. मोरे यांच्यासह त्यांच्या कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
