गेवराईमध्ये पावणेपाच लाखाची दारू पकडली
Beed Reporter
गेवराई :मध्ये पावणेपाच लाखाची दारू पकडली पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड यांची धडाकेबाज कारवाई गेवराई लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दारूचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी सर्रासपणे दारू विक्री होत आहे. गेवराईमध्ये काल एका बिअर शॉपीची दारू एका छोटा हत्तीमध्ये घेवून जात असताना पोलिसांनी जप्त केली. सदरील कारवाई पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड, सहाय्यक उपनिरीक्षक सुनिल आयतवार यांनी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शनिवारी रात्री १० वा.
गेवराई पोलिसांनी माहिती मिळाली की, गेवराई शहरातील कोल्हेर रोडवरील यशराज वाईन शॉपीमधून बेकायदेशीररित्या बियर, दारू विक्री होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे धाड टाकली असता रात्री ११ वा. त्याठिकाणी छोटा हत्ती क्र.एम.एच.४६ ई.२४९५ यामध्ये दोन इसम बियरबॉक्स टाकत असताना आढळून आले. यावेळी एकजण फरार होण्यात यशस्वी झाला. तर दुसरा गणेश कल्याण जराडे वय २३ वर्ष, रा.संजय नगर गेवराई याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी वाहनातून २६ बॉक्स किंगफिशर कंपनीचे मिळून आले.
सदर वाईनशॉपीची पाहणी केली असता वाईन शॉपीच्या बाहेर बियरचे बॉक्स आढळून आले. सदरील दारू पोलिसांनी जप्त केली. असा एकूण मुद्देमाल ४ लाख ७५ हजार ६२४ रूपयाचा जप्त केला. याप्रकरणी वाहन चालक गणेश कल्याण जराडे व यशराज बियरशॉपीचे मालक यांच्याविरोधात कलम ६५, ३ (ई)(ड), ८१, ४३ सह कलम १८८, २८९, २७०, २९० भादविसह ५१ (ब) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे, डिवायएसपी स्वप्नील राठोड, पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम चोभे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड, सहाय्यक उपनिरीक्षक सुनिल आयतवार, चने गोविंतवाड, खवले यांच्यासह आदिंनी केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड ह्या करत आहेत.
