बीड बातम्या
सांगवी येथील कोरोनाबाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात इतरत्र फिरतानाचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सांगवी (ता. आष्टी) येथे नातेवाईकांकडे मुंबईहून आलेल्या व नगर जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेले ७ जण कोरोनाबाधित आढळले होते.
यातील ६५ वर्षिय महिलेचा साेमवारी पहाटे मृत्यू झाला होता. दरम्यान, उर्वरित सहा रुग्णांना त्यांच्या विनंतीनुसार सोमवारी सायंकाळी पुण्याच्या रुग्णालयात हलवण्यात आले. यासाठी विशेष परवानगी घेतली गेली. पुण्याला जाण्यासाठी रुग्णालयाबाहेर त्यांना आणण्यात आले होते.
सर्व रुग्णांना सूचना देण्यात आल्या. यात कुणी निष्काळजीपणा केला याबाबत चौकशी सुरु केली गेली आहे. शिवाय, कोरोना कक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णांवर गांभीर्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा रुग्णालय अथवा जिल्ह्यातील इतर कोणत्याही सरकारी रुग्णालयात, क्वारंटाईन सेंटरमध्ये अथवा होम क्वारंटाईन शिक्का असलेली कुणी संशयित, बाधित व्यक्ती इतरत्र फिरताना आढळून आल्यास तत्काळ आरोग्य विभागाला कळवा जेणेकरून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सोईचे होईल.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर