करोना संकट: रत्नागिरीत उसळली मुंबईकरांची गर्दी
याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा मुंबई व इतर जिल्ह्यांतून रत्नागिरीत प्रचंड संख्येने येणाऱ्या लोकांमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ४०० करोना पॉझिटिव्ह व १५०० सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे.
मात्र, दिवसेंदिवस जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. हे चित्र असेच राहिल्यास व रुग्णालयांतील जागा अपुरी पडल्यास भविष्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांना देखील होम क्वारंटाइन करावे लागू शकते, असे सांगितले जात आहे. मुंबईतून येणारे ६० टक्के नागरिक पास घेऊन तर ४० टक्के नागरिक कोणतीही परवानगी न घेता येत आहेत.

