Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

देवेंद्रजींसारखं काम कुणी केलेलं नाही अन् कुणी करणारही नाही- अमृता फडणवीस




 देवेंद्र फडणवीस यांनी 200 टक्के  काम केलंय. देवेंद्रजींसारखं काम आजपर्यंतही कुणी केलेलं नाही, आणि इथून पुढेही कुणी करू शकणार नाही, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

फडणवीसांच्या कामाची दखल पक्षातल्या वरिष्ठांनीही घेतली. आणि जनतेनेही. त्यामुळे जनतेनेही भाजपला सर्वाधिक संख्याबळ असणारा पक्ष बनवलं. आणि यापुढचीही त्यांची वाटचाल या बाबी लक्षात घेऊनच होईल, असा विश्वास अमृता यांनी व्यक्त केला आहे.

राजकीय नेत्यांना सद्बुद्धी यायला हवं. आपण कुठे आहोत हे लक्षात आलं पाहीजे. आणि सरकार लवकरात लवकर स्थापन व्हायला पाहिजे, असं मत अमृता फडणवीस यांनी याआधी एका हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केलं होतं.

सत्तेच्या वाटाघाटीवर युतीत एकमत होताना दिसत नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतल्या समान वाट्यावर अडून आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार नाही. अशात निकाल लागून आठवडा उलटला तरी महाराष्ट्राला आपला मुख्यमंत्री कोण हे कळायला मार्ग नाही.