माजलगांव :- परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे फोटो व विमा भरलेली पावती ही विमा कंपनीच्या मेलवर पाठवायची मुदत कंपनीने फक्त ७२ तास ठेवलेली असुन ती मुदत आठ दिवसांची करावी अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. अगोदरच दुष्काळाने मारलेल्या शेतक-यांना परतीच्या पावसाने उद्वस्त केल्यानंतर शेतक-यांच्या शेतातील पिकांचे पुरावे द्या म्हणत विमा कंपन्या विम्याच्या पावतीसह सातबारा आणि एक अर्ज ७२ तासात शेतक-यांकडून मागवून घेत आहेत. मात्र ऑनलाईन सातबारा अपडेट नसल्याने शेतक-यांच्या शेतातील पिकात आणि
ऑनलाईन सातबारारत्र पिकांमध्ये मोठी तफावत येण्याची शक्यता असून कृषी विभागाला कुठला सातबारा द्यायचा याच्या स्पष्ट सुचना आल्या नसल्याने शेतकरी गोंधळलेल्या स्थितीत आहे तर तलाठी शेतक-यांच्या या गोंधळलेल्या परिस्थितीची मजात घेत आहे तर विमा कंपन्या पुन्हा शेतक-यांचा घात करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ७२ तासांएैवजी किमान आठ दिवसांचा वेळ वाढवुन द्यावा अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे.
चैकट
याप्रकरणी आयुक्त सुनिल केंद्रेकर व अग्रीकल्चर कमीशनर यांचेशी फोनवर सकारात्मक चर्चा झाली असुन वेळ वाढवुन देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान याप्रकरणी माजलगांव मतदारसंघातील सर्व कृषी अधिकारी, महसुल विभागातील अधिका-यांची बैठक लवकरच घेण्यात येणार असुन शेतक-यांना नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगीतले आहे.
