Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपाकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी


सत्ता स्थापनेसाठी सेना-राष्ट्रवादी,कॉंग्रेस एकत्र येण्याचे संकेत दबावासाठी भाजपाकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी

मुंबई :- प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे धोरण असलेल्या भारतीय जनता पार्टीला कालच्या निवडणूकीत बहुमत मिळाले नसल्याने भाजपा अडचणीत आली. शिवसेनेला मानापानाचं स्थान देत नसल्याने सेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या माध्यमातून सरकार स्थापनेचे धोरण आखत असल्याचे संकेत येताच आज सुधीर मुनगंटीवारांनी सात दिवसाच्या आत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी थेट जणू धमकीच शिवसेनेला अप्रत्यक्ष देवून दबाव तंत्र वाढवण्याचा प्रयत्न केला असला तरी शिवसेना मुख्यमंत्री पदावर अद्यापही अडून असून सेनेला शह देण्यासाठी भाजपा वेगवेगळ्या चाली खेळतांना दिसून येत आहे. त्यामुळे अद्यापही सत्ता स्थापनेचा तिढा सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुटला नाही. 
कालपर्यंत कॉंग्रेस शिवसेनेसोबत जाणार नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतू पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातले सर्व अधिकार राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खा.शरद पवारांनी दिल्यानंतर रात्रीतून महाराष्ट्रात राजकीय धरणीकंपाला सुरूवात झाली. शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे सत्ता स्थापनेबाबत हालचाली करत असल्याचे संकेत मिळू लागल्यानंतर भाजपा अस्वस्थ झाली आणि आज सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा शिवसेनेवर दबाव तंत्राची भाषा सुरू ठेवली. सात नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असे सुचक विधान करून सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दिवाळीमुळे चर्चेश उशिर झाल्याचे सांगत येत्या दोन-तीन दिवसात शिवसेना भाजप युती सत्तास्थापन करेल असा विश्‍वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे मात्र कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येवून सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याचे संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. संजय राऊत यांनी आज पुन्हा ठरले तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते. महाराष्ट्राची जनता शिवसेनाचा मुख्यमंत्री पाहू इच्छित आहे असं म्हणून मुख्यमंत्री पदासह समसमान वाटप झाले पाहिजे अशी पुन्हा त्यांनी मागणी केली. त्यामुळे अद्यापही सरकार स्थापनेचा तिढा युती आणि आघाडीकडून सुटला नसल्याचे दिसून येते. मात्र ताज्या घडामोडीनुसार राज्यात शरद पवार सांगतील तसेच सरकार स्थापन होईल असे जानकारांचे सांगणे आहे. 

सत्ता स्थापनेसाठी सेना-राष्ट्रवादी,कॉंग्रेस एकत्र येण्याचे संकेत
दबावासाठी भाजपाकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून; सेनेला शह देण्यासाठी भाजपाच्या चाली सुरू