WhatsApp मध्ये मिळणार दोन नवीन फीचर :
- व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे. इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने दोन नवीन फीचर आणले आहेत.
- व्हॉट्सअॅपसंबंधी माहिती देणाऱ्या WABetainfo या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये Haptic Touch चा सपोर्ट देण्यात येत आहे.
- तर याशिवाय, डार्क थीममध्ये तीन ऑप्शन सुद्धा दिले जाणार आहेत.
- व्हॉट्सअॅप डार्क मोडची टेस्टिंग सुरु आहे आणि यात तीन ऑप्शन देण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑटो डार्क मोडचा ऑप्शन असणार आहे. याद्वारे जर तुम्ही अँड्राईड स्मार्टफोनमध्ये डार्क मोड यूज करणार असाल, तर व्हॉट्सअॅप सुद्धा डार्क मोडमध्ये जाईल. Haptic Touch फीचरबाबत सांगायचे झाल्यास व्हॉट्सअॅप चॅट आणि मीडियामध्ये याचा सपोर्ट मिळणार आहे.
- तसेच हे फिचर व्हॉट्सअॅपच्या पुढील ऑफिशियल व्हर्जनमध्ये दिले जाणार आहे. हे व्हॉट्सअॅपचे 2.20.10 व्हर्जन असणार आहे.
- डार्क मोडच्या माध्यमातून युजर्संना एक ऑप्शन लो डेटा मोड सुद्धा दिले जाणार आहे. म्हणजेच, जर तुमचा स्मार्टफोन बॅटरी सेव्हर मोडवर आहे, तर व्हॉट्सअॅप स्वत: डार्क मोडवर जाईल.
फोर्ब्स इंडियाच्या यादीत मराठमोळ्या जोडीचा समावेश :
- फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रीटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे.
- तर या यादीत अजय-अतुलची जोडी 22 व्या क्रमांकावर असून या जोडीची वार्षिक कमाई 77.91 कोटी आहे.
- फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रीटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे.
- पण पहिल्यांदाच या यादीत एका मराठमोळ्या संगीतकाराच्या जोडीची वर्णी लावली आहे. हे संगीतकार दुसरे कोणीही नसून मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल आहेत. या यादीत ही जोडी 22 व्या क्रमांकावर असून या जोडीची वार्षिक कमाई 77.91 कोटी आहे.
- फोर्ब्स इंडियाच्या यादीत पहिल्या स्थानावर भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीची वार्षिक कमाई 252.72 कोटी आहे. तर दुसऱ्या स्थानावर अभिनेता अक्षय कुमारने स्थान मिळवले आहे. अक्षयची वार्षिक कमाई 293.25 कोटी रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान आहे. सलमानची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.
दिनविशेष:
- सन 1777 मध्ये कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
- स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म 24 डिसेंबर 1880 मध्ये झाला होता.
- बालसाहित्यक, समाजवादी नेते, समाजसुधारक तसेच स्वातंत्र्यसैनिक ‘पाडुरंग सदाशिव साने‘ उर्फ साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर सन 1899 रोजी झाला होता.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 24 डिसेंबर सन 1910 रोजी जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.
