Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शहरात ट्रॅव्हल्स आणल्या, तिघा जणांविरोधात गुन्हे दाखल



बीड :- शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या अनुषंगाने ट्रॅव्हल्ससाठी बाहेर पार्किंग करण्याचे नियोजन पोलिस प्रशासनाने केलेले आहे मात्र रात्री नियम तोडून तीन ट्रॅव्हल्स शहरामध्ये आल्या. या तिन्ही ट्रॅव्हल्सच्या मालकांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शहरामध्ये ट्रॅव्हल्स न थांबण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी त्या त्या विभागात ट्रॅव्हल्ससाठी पार्किंगचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरामध्ये ट्रॅव्हल्स आल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने आधीच दिलेला होता. नियम तोडून रात्री ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच.९ सी.ए. १२५७), (एम.एच. २३ डब्ल्यू. ७८६०), (एम.एच. ०४ एफ के ०९५६) या तिन गाड्या आल्या असता या तिन्ह ट्रॅव्हल्सच्या मालकांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.