Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सीएस परीक्षेचे पेपर पुढे ढकलले CA Examination Papers Postponed



‘इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएसआय) घेण्यात येणाऱ्या कंपनी सेक्रेटरीच्या (सीएस आणखी दोन दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आज (सोमवार) व उद्या (मंगळवार) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, असे ‘आयसीएसआय’तर्फे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, २६ डिसेंबरपासूनचे सर्व पेपर पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘आयसीएसआय’तर्फे २० ते ३१ डिसेंबर दरम्यान कंपनी सेक्रेटरी परीक्षा घेण्यात येणार होती. त्यानुसार देशभरातील केंद्रांवर परीक्षेची तयारीही पूर्ण करण्यात आली होती. मात्र, पहिल्यांदा २० व २१ तारखेला होणारे दोन पेपर पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या दोन दिवसांत एक्झिक्युटिव्ह व प्रोफेशनल प्रोग्रॅममधील जुन्या व नव्या अभ्यासक्रमाच्या एकूण आठ विषयांच्या परीक्षा होणार होत्या. त्यानंतर आता २३ व २४ डिसेंबरला होणारे पेपरदेखील पुढे ढकलण्यात आल्याचे ‘आयसीएसआय’ने स्पष्ट केले आहे. दिनांक २३ व २४ रोजी देखील एक्झिक्युटिव्ह व प्रोफेशनल प्रोग्रॅममधील एकूण आठ पेपर होणार होते.

देशभरातील काही शहरांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयसीएसआयमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. पूर्वी रद्द केलेल्या व आता रद्द केलेल्या सर्व पेपर्सची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल. मात्र, २६ डिसेंबरपासूनचे सर्व पेपर्स पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे ‘आयसीएसआय’च्या परीक्षा विभागाच्या सहसचिवांनी अधिकृत पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.




The CS Secretaries (CS) held by the Institute of Company Secretaries of India (CSCS) have been postponed for two more days, which have been postponed today (Monday) and tomorrow (Tuesday). Meanwhile, all the papers from December 26 to the pre-planned timeline, "the ICSI said. It has also been clarified that it will be done according to Rak.

'ICSI' was to hold the company secretary exam from December 20 to 31. Accordingly, preparations for the examination were also completed at centers across the country. However, for the first time, it was clarified that two papers, dated 20 and 21, were postponed. During these two days, a total of eight subjects of the old and new courses in the Executive and Professional programs were to be tested. Thereafter, the paper is now postponed to December 23and 24, 'ICSI said. A total of eight papers from executive and professional programs were to be held on 23-24

The decision was taken to ensure that the ongoing protests in some cities across the country do not hurt the students, sources in the ICSI said. A new date for all previously canceled and now canceled papers will be announced soon. However, all the papers from December 26will be on a pre-planned timeline, the ICCI Examination Department's joint secretary said in an official letter.