Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

औरंगाबाद 20 मेपर्यंत शहरात कडक अंमलबजावणी...


जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये 20 मे पर्यंत लॉकडाऊन जाहिर केला आहे.

या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी दिले आहेत.
शहरात पोलिस प्रशासनाकडून कंन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कंन्टेनमेंट झोनमधून नागरिकांचे बाहेरील भागात तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कंन्टेनमेंट झोनमध्ये होणारी आवागमन बुधवार पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात कंन्टेनमेंट झोनमध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना संबंधित यंत्रणांना देत नागरिकांनीही सहकार्य करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले आहे.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर