⚡ टाटा ट्रस्टतर्फे राज्यात सांगली आणि बुलढाणा येथील दोन सरकारी रुग्णालयांच्या इमारतींमध्ये सुधारणा करून कोविड-19 उपचार केंद्रे विकसित केली जात आहेत. या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येणारे रुग्ण आणि बाह्य रुग्णांना देणाऱ्या उपचार सुविधा फक्त कोरोनादरम्यान नसून कायमस्वरूपी मिळणार आहेत.
💁♂️ नुकतेच रतन एन टाटा यांनी, कोविड 19 विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तत्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे असल्याचे निवेदन जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
😷 सुविधा : महाराष्ट्रात सांगली (50 बेड्स) व बुलढाणा (106 बेड्स) येथे ही रुग्णालये उभारली जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयामध्ये अत्यवस्थ रुग्णांसाठीच्या सेवा, छोटी ऑपरेशन थिएटर, सामान्य पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, डायलिसिस सुविधा, रक्त साठवणी सुविधा व टेलिमेडिसिन युनिट उपलब्ध केल्या जाणार आहेत.
👉🏻 रुग्णालयांचे बांधकाम : रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी टाटा ट्रस्ट कर्करोग उपचार सुविधा निर्माण करण्यातील आपल्या अनुभवांचा वापर करत आहे. तसेच सेवा पुरवठादारांनाही या कामासाठी जोडले आहे. या रुग्णालयांचे बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड करत असून डिझाइन एडिफीस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे. सर्व उपकरणे आघाडीच्या उत्पादकांकडून घेतली जात आहेत.
📌 तिसरा उपक्रम : भारताच्या कोविड-19 लढ्यामध्ये मदतीसाठी टाटा ट्रस्टकडून हाती घेतलेला हा तिसरा उपक्रम आहे. टाटा ट्रस्टने राज्य सरकारांना आणि वेगवेगळ्या रुग्णालयांना मदत म्हणून व्यक्तिगत सुरक्षा साधने पुरवण्यास आधीच सुरुवात केली आहे. यामध्ये कव्हरऑल्स, एन95/केएन95 मास्क्स, सर्जिकल मास्क्स, हातमोजे आणि गॉगल्स यांचा समावेश आहे.