⚡ दररोज देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताने चीनला मागे टाकले आहे. शनिवारी, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांच्या पुढे गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजार 648 झाली आहे.
💁♂️ गेल्या आठ दिवसातील कोरोनाग्रस्त विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. स्थलांतरामुळे शहरातील कोरोना गाव खेड्यात पोहचल्याचे दिसून येत आहे.
😷 पाच शहरातील रूग्ण : देशातील मोठ्या शहराची परिस्थिती चिंताजनक असून एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील आहेत.
📌 पाच शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 46 हजार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या दोन हजार 871 इतकी असून, 34 हजार 224 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर