Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गेवराई, माजलगाव व बीड तालुक्यातील काही गावे कंटेनमेंट झोन घोषित


माजलगाव व गेवराई तालुक्यात आज दोन कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासानाने तातडीने रुग्ण आढळलेल्या परिसरातील गावे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. 

त्यानुसार आता या गावात पुढील अनिश्चित कालावधीसाठी पुर्ण वेळ संचारबंदी लागू असेल. या गावात कोणीही बाहेरून आत जाऊ शकणार नाही आणि आतून बाहेरही येऊ शकणार नाही.

त्यानुसार गेवराई तालुक्यातील ईटकूर या गावापासून गेवराई तालुक्यातील 3 कि.मी. परिसरातील ईटकूर, हिरापूर, शिंपेगाव, कुंभारवाडी व बीड तालुक्यातील खामगाव, नांदूर हवेली, पारगाव जप्ती हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 
तर कंटेनमेंट झोन पुढील 4 किं.मी. परिसरातील गेवराई तालुक्यातील लोळदगाव, अंकोटा  शहाजानपूर चकला, मादळमोही, कृष्ण नगर, पाडळशिंगी, टाकळगाव तर बीड तालुक्यातील आहेर चिंचोली, कामखेडा, पेंडगाव, हिंगणी हवेली, तांदळवाडी हवेली व पारगाव शिरस ही बफर झोन म्हणून घोषित झाली आहेत.

तर माजलगाव तालुक्यातील  हिवरा बु. या गावापासून तीन किमी परिसरातील, हिवरा बु., गव्हाणथडी, काळेगाव थडी, डुब्बाथडी व भगवाननगर, ही गावे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. कंटेनमेंट झोननंतर पुढील 4 किंमी. 

परिसरातील राजेगाव, सुर्डी (न), महातपुरी, वाघोरा, वाघोरा तांडा, ही गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात येत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी हे आदेश शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास काढले आहेत.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर