अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या ५३ रुग्णांपैकी तब्बल ४० रुग्ण हे करोना आजारातून बरे झाले आहेत. जामखेड, कोपरगाव व धांदरफळ (ता. संगमनेर) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर: गेल्या तीन दिवसांमध्ये करोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत असतानाच, सोमवारी चार रुग्ण या आजारातून बरे झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. हे सर्व जण जामखेड येथील असून, त्यांना सोमवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यातील 'करोना'मुक्त झालेल्यांची संख्या ४० झाली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ५३ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, ७ मेपर्यंत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४४ होती. मात्र, शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसांमध्ये तब्बल नऊ करोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात सापडले असून, हे सर्व जण संगमनेर तालुक्यातील आहेत.स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वसतीगृहाच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात रखरखत्या उन्हात एक नवजात अर्भक सापडलं.
दोनच दिवसांत रुग्णसंख्या वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सोमवारी करोना आजारातून चार जण बरे झाल्याचे समोर आले. या सर्वांवर बूथ हॉस्पिटलच्या 'आयसोलेशन वार्ड'मध्ये उपचार करण्यात येत होते. हे उपचार यशस्वी झाले असून, त्यांचे पुणे येथे पाठवण्यात आलेल्या स्त्राव नमुन्यांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.
त्यामुळे या सर्वांना सोमवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या ५३ रुग्णांपैकी तब्बल ४० रुग्ण हे करोना आजारातून बरे झाले आहेत. जामखेड, कोपरगाव व धांदरफळ (ता. संगमनेर) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत दहा रुग्णांपैकी नऊ जणांवर बूथ हॉस्पिटलच्या 'आयसोलेशन वार्ड'मध्ये तर एका रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील आठ, पाथर्डी येथील एक आणि जामखेड येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
