21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कोरोनावर मात करण्याच्या बाता हवेतच विरल्या आहेत,
अशा शब्दात कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधलं आहे.
केंद्र सरकारने रेल्वे सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आणि केंद्रीय आरोग्य सहसचिव लव्ह अगरवाल यांचे कोरोनाबरोबर जगायला शिका, असं म्हणणं याचा अर्थ मोदी सरकारने करोनाविरुद्धच्या लढाईत हात वर केले आहेत. संकट मोठं असतानाही देशाला मोदींनी राम भरोसे सोडले आहे का?
केंद्र सरकारकडे आता काही उपाय शिल्लक राहिले नाहीत का? असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केलं आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार मात्र कोरोनाविरुद्ध लढाई सुरुच ठेवणार असल्याचंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

