एका सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून अमानुषपणे तिचे डोळे फोडल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशातील दामोह येथे बुधवारी रात्री घडल्याचे उघड झाली आहे. या घटनेचे पडसाद मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी उमटले असून पोलिसांनी गुरुवारी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
लॉकडाउन सुरू झाल्यापासून मध्य प्रदेशातील बलात्काराची ही तिसरी घटना आहे. पीडित मुलगी एका जंगलात आढळली. तिच्या डोळ्यातून रक्त गळत होते. तसेच तिचे हात आणि पाय बांधलेले होते. तिला जबलपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्या डोळ्यावर उपचार करण्यात आले. तेथे तिची दृष्टी वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.